Maharashtra Corona Update : कोरोना उद्रेक ! राज्यात दिवसभरात सर्वाधिक 19,218 नव्या रुग्णांची नोंद;  378 मृत्यू

महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 8 लाख 63 हजार 062 एवढी झाली आहे.

एमपीसी न्यूज – राज्यातील रुग्ण संख्या वाढीचा वेग कमी होताना दिसत नाही. आज दिवसभरात राज्यात आजवरची सर्वाधिक 19 हजार 218 नव्या कोरोना रुग्णांची नोंद वाढ झाली आहे.  तर  378 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 8 लाख 63 हजार 062 एवढी झाली आहे. 

राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील 8.63 लाख एकुण रुग्णसंख्यापैकी 6 लाख 25 हजार 773 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सध्या 2 लाख 10 हजार 978 सक्रिय रुग्णांवर राज्यात उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात 378 रुग्णांचा मृत्यू झाला यासह राज्यातील मृतांची संख्या 25 हजार 964 एवढी झाली आहे.

राज्यात दिवसेंदिवस वेगाने होणारी रुग्ण वाढ चिंतेचा विषय बनला आहे. आज दिवसभरात 13 हजार 289 उपचारानंतर बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 72.51 टक्के एवढा आहे तर, मृत्यू दर 3.01 टक्के आहे.

राज्यात तपासण्यात आलेल्या 44 लाख 66 हजार 249 नमूण्यापैकी 8 लाख 63 हजार 062 (19.32%) नमूणे पाॅझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 14 लाख 51 हजार 343 जण होम क्वारंटाइन आहेत तर, 36 हजार 873 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

देशातील 62 टक्के कोरोना रुग्णसंख्या केवळ पाच राज्यात (महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक व उत्तर प्रदेश) आहे यापैकी 25 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात असल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. महाराष्ट्रात सध्या पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.