Maharashtra Corona Update : राज्यात आज विक्रमी 47,827 नव्या कोरोना रुग्णांची वाढ

एमपीसी न्यूज – राज्यात आज, शुक्रवारी दिवसभरातील आजवरची सर्वाधिक रुग्ण वाढ झाली आहे. दिवसभरात राज्यात तब्बल 47 हजार 827 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. यासह एकूण रुग्णांची संख्या 29 लाख 04 हजार 076 वर जाऊन पोहोचली आहे.

आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 24 लाख 57 हजार 494 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 24 हजार 126 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.64 टक्के एवढं झाले आहे. राज्यात सध्या राज्यात 3 लाख 89 हजार 832 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज 2020 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 55 हजार 379 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.91 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 21 लाख 01 हजार 999 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 19 हजार 237 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 01 लाख 58 हजार 719 नमूने तपासण्यात आले आहेत.

पूर्ण लॉकडाऊनच्या मी विरोधात आहे. पण, वाढत्या रुग्णांची संख्या आटोक्यात आली नाही तर राज्यात कडक निर्बंध लावण्याशिवाय पर्याय नाही. येत्या दोन दिवसांत नियमावली जाहीर केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करताना ते बोलत होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.