Maharashtra Corona Update : आज 5,439 नवे कोरोना रुग्ण, 30 बाधितांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – राज्यात आज 5 हजार 439 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 4 हजार 86 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण 16 लाख 58 हजार 789 करोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 92.69 टक्के इतका झाला आहे.

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज 30 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील मृत्यू दर हा 2.61 टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 3 लाख 66 हजार 579 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 17 लाख 89 हजार 800 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात एकूण चाचण्यांची संख्या एक कोटीच्या पुढे गेली आहे मात्र मागील काही दिवसांपासून दररोज होणा-या चाचण्यांची संख्या घटली आहे. दररोज 70 ते 80 हजारांच्या दरम्यान या चाचण्या होत आहेत. कमी केलेलं चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याची गरज तज्ञानी व्यक्त केली आहे.

कोरोना रुग्णांचा ग्रोथ रेट महाराष्ट्रात कमी आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्र सेफ झोनमधे आहे, असं वक्तव्य महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ‘

देशाचा ग्रोथ रेट 0.4 टक्के आहे तर महाराष्ट्राचा कोरोना ग्रोथ रेट हा 0.2 टक्के आहे असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्राच्या टीमनं दशलक्ष लोकांमागे चाचण्या वाढवण्यास सांगितलं. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चाचण्या कमी झाल्या. परंतु, त्या चाचण्या कमी होण्याचं प्रमाण तात्पुरतं होतं. आता आपण पुन्हा चाचण्यांची संख्या वाढवतोय. म्हणून रुग्णांची संख्याही पुन्हा वाढताना दिसतेय. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही आम्ही यावर चर्चा केली, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.