Pune Crime News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या रोडरोमिओला अटक

एमपीसी न्यूज : कोंढवा येथील भाग्योदयनगर मध्ये असणाऱ्या एका शाळेत जाऊन 17 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या रोडरोमिओला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. सईम कलिम शेख (वय 21, भाग्योदयनगर, नवाजिश पार्क, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या रोडरोमियो चे नाव आहे.  पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंढवा येथील भाग्योदय नगर मध्ये ही शाळा आहे, आरोपी हा वारंवार या मुलीला ‘चल तुझे घुमाके लाता हु’ असे म्हणत तिची छेड काढत होता.

_MPC_DIR_MPU_II

सहा फेब्रुवारी रोजी तर त्याने कहरच केला. या मुलीच्या शाळेत जाऊन त्याने तिची छेड काढली. तुझ्यामुळे मला मार खावा लागला असे म्हणत अल्पवयीन मुलीचा हात धरून स्वतःकडे ओढले. या मुलीने हा सर्व प्रकार घरी सांगितला नंतर तिच्या भावांनी आरोपीला या याबाबत जाब विचारला असता त्याने त्यांनाही मारहाण केली.

त्यानंतर पीडित मुलीच्या आईने कोंढवा पोलिस ठाणे गाठून त्याच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटकही केली आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.