Manobodh by Priya Shende Part 35 : असे हो जया अंतरी भाव जैसा

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 35 (Manobodh by Priya Shende Part 35)

असे हो जया अंतरी भाव जैसा

वसे हो तया अंतरी देव तैसा

अनन्यास रक्षितसे चापपाणी

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी

मागच्या काही श्लोकांमधून भगवंताचे अवतार, त्यांनी केलेल्या लीला, तो कसा आहे याचं वर्णन समर्थांनी केलं होतं. हा श्लोक माणसाच्या अंतर्मनाचा ठाव घेताना दिसतोय. भगवंत कसा आहे हे सोदाहरण सांगून झालं, पण माणूस कसा आहे किंवा पाहिजे यावर समर्थ भाष्य करताना दिसत आहेत. (Manobodh by Priya Shende Part 35) ते म्हणतात की, “असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा”.

खरंतर प्रत्येक देहात, प्रत्येक ठिकाणी देव हा आहेच. आपण पाहिलंय यापूर्वी की, गर्भात जेव्हा जीव येतो तेव्हा तो सोsहम सोsहम म्हणत असतो. कारण तो परमेश्वराचा अंश असतो. पण जशी नाळ कापली जाते तसा तो कोsहम कोsहम विचारायला लागतो, म्हणजेच मी कोण आहे? मी कोण आहे? तो परमेश्वराला विसरतो. हळूहळू अहंकार त्याच्यात रुजतो, वाढायला लागतो आणि जे काही केले, ते मी केले, माझ्या कर्तृत्वानं केलंय, असा वृथा अभिमान सांगत फिरतो. देवाची भक्ती, त्याची शक्ती, त्याची कृपा सगळं विसरून जातो.

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर

माणूस स्वतःच्या मस्तीत संसारात एकरूप होतो, त्यामुळे अंतकरणात देवाचा अंश आहे हे पण विसरतो. तो किती खोलवर रुजला आहे, त्यानुसार देव आपल्याला भासतो, दिसतो, पावतो सुद्धा. आपण साधा नमस्कार सुद्धा औपचारिकतेने केला किंवा दुसरे करतात म्हणून केला किंवा आंतरिक भीतीने केला तर तो पावेल का हो?

आपण आपल्या आत असलेल्या देवाचं ऐकत नाही त्याची दखलही घेत नाही आणि बाहेर आपल्या दुःखाचे प्रश्नांचे तोडगे काढायला जातो. आपण आपल्या मध्ये असलेल्या परमेश्वराशी श्रद्धापूर्वक संवाद केला तर तो आपल्याला तारून नेईल. पण इतका दृढ विश्वास आपल्याला हवा त्या परमेश्वराविषयी.

Todays Horoscope 14 May 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

अंतरी भावा म्हणजे काय तर माझ्यातला मी पणा सोडून परमेश्वराचा वास हा जाणा सगळीकडे जाणवतो. त्या ईश्वराचे अस्तित्व सर्व ठिकाणी त्याला दिसायला लागतं आढळतं इतकी एकरूपता आपली आणि भगवंताचे होते.

तेव्हा समर्थ सांगताहेत (Manobodh by Priya Shende Part 35) की,” अनन्यास रक्षितसे चापपाणी”. हे जेव्हा परमेश्वराशी तादात्म्य साधलं जातं, अनन्यभावाने, कसलीही शंका न घेता, आपण त्या परमेश्वराची भक्ती केली, त्याला शरण गेलोत, मनात लीनपणाचा भाव असेल तर, हा चापपाणी म्हणजेच धनुर्धारी नक्कीच रक्षण करतो. आम्ही दुसऱ्या कोणालाही शरण न जाता, फक्त आणि फक्त तुलाच शरण येतो, अशी प्रार्थना जेव्हा आपण करतो, त्यालाच अनन्य भावाने केलेली भक्ती म्हणतात.

अनन्यभावाने शरण येणाऱ्या भक्ताचं परमेश्वर निश्चित रक्षण करतो. कारण भक्ताला जसा भगवंताचा अभिमान असतो, तसाच रामाला सुद्धा आपल्या दासांचा म्हणजेच भक्तांचा अभिमान असतो. अशा भक्ताचे रक्षण करतो. इतकच काय तर चरितार्थही चालवतो. म्हणूनच समर्थ याही श्लोकात विश्वास देत आहेत की, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी”.

जय जय रघुवीर समर्थ

– प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.