मनोबोध : मनाचे श्लोक क्रमांक 88-बहु चांगले नाम या राघवाचे

एमपीसी न्यूज – मनोबोध भाग 88 – बहु चांगले नाम या राघवाचे (Manobodh by Priya Shende Part 88)

बहु चांगले नाम या राघवाचे

अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे

करी मूळ निर्मूळ घेता भवाचे

जीवा मानवा हेचि कैवल्य साचे

 

या श्लोकांमध्ये समर्थांनी रामनामाचे महत्त्वं सांगितले आहे.  रामनाम कसं आहे ते सांगितलंय.  हे सांगताना पहिल्या चरणांत ते म्हणताहेत की,”बहु चांगले नाम या राघवाचे”.  म्हणजेच या भगवंताचे नाम म्हणजे नाव अतिशय चांगलं आहे. राघवाचं नाव अतिशय त्याला शोभेसं म्हणजे सुंदर आहे.  अतिशय सोपं आहे आणि ते फुकाचे म्हणजे फुकट आहे.

राम हा शब्द म्हणायला किती सोपा आहे, नाही का?  कोणालाही सहजपणे उच्चारता येईल असा आहे.  अगदी न शिकलेला माणूस देखील सहजपणे हा शब्द उच्चारून हा मंत्र (Manobodh by Priya Shende Part 88) जपू शकतो. कधीकधी मंत्र इतके कठीण असतात उच्चारायला की त्याचे उच्चार नीट करता येत नाहीत. चुकीचे उच्चार झाले तर त्याचा अर्थही बदलू शकतो.  मग अशा मंत्रांचा काही उपयोग होणार नाही.  पण रामनामाचा मंत्र अत्यंत सोपा आहे.  सुंदर आहे.  दोन अक्षरी म्हणजे एकदम छोटाच आहे.

त्यामुळे दुसऱ्या चरणात समर्थ म्हणतात की, “अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे”. म्हणजे अत्यंत सुंदर शोभिवंत साजेसं, शोभेलसं हे नाव आहे.  स्वल्प म्हणजे छोटेसे.  फक्त दोनच अक्षरी आहे. एकदम सहज सोपे आहे. जे कोणीही म्हणू शकतं.  त्याचं उच्चारण अगदीच सोपं आहे.  पुन्हा पुन्हा म्हटलं तरी ते सोपं वाटतं.  परत परत म्हणावंसं वाटतं.  ते सुंदर, सोपं आणि छोटंसं, पटकन म्हणण्यासारखं असल्यामुळे त्याचा जप करावासा वाटतो.  पुन्हा पुन्हा म्हणावसा वाटतं.  त्याची ओढ निर्माण होते आणि महत्त्वाचं म्हणजे ते फुकाचं आहे म्हणजे ते फुकट आहे.

Mahalunge : चाकूच्या धाकाने मोबाईल पळवणाऱ्यास नागरिकांनी पकडले

ह्या रामनामासाठी ना पैसा लागतो, ना वेळ, ना ताकद.  आपण विनासायास हा मंत्र म्हणू शकतो.  बाकी साधनांना शारीरिक स्पष्ट पडतात किंवा आर्थिक कष्ट पडतात.  परंतु राम म्हणायला शारीरिक कष्टही पडत नाहीत आणि धनही खर्च होत नाही.  बरं एवढं सगळं कशासाठी करायचं? त्याचं महत्त्वं काय?  रामनामाने नेमकं होतं काय?

तर ते सांगताना समर्थ पुढे म्हणताहेत की,”करी मूळ निर्मूळ घेता भवाचे”. म्हणजेच या संसार रुपी दुःखाचा हे रामनाम मुळापासूनच नाश करते आणि या संसार रूपी दुःखातून आपल्याला बाहेरही काढते.  असे हे (Manobodh by Priya Shende Part 88) सर्वगुण संपन्न रामनाम घेतल्यामुळे माणसाला कैवल्याची म्हणजे चिरंतन सुखाची प्राप्ती होऊ शकेल.  माणसाला मोक्ष मिळणे म्हणजेच चिरंतन सुख आहे. आणि त्यासाठीच रामनाम घेणे अत्यंत जरुरीचे आहे. म्हणजेच “जीवा मानवा हेचि कैवल्य साचे*.

कसंय बघा सामान्य माणसाला देहाचं सुखदुःख, हे खरं सुख दुःख वाटतं.  देहाचं सुख म्हणजे आपलं सुख, देहाला दुःख.. वेदना म्हणजे खऱ्या वेदना असं वाटत असतं.  त्यामुळे देहाबद्दलच खूप आसक्ती वाटते.  पण रामनामामुळे ही आसक्ती कमी होते आणि त्यामुळे देहाची सुखदुःख जाणवणार नाहीत.  नाम नेमकं हेच काम करतं.  नामामुळे देहाची आसक्ती कमी होते.  त्यामुळे सतत रामनामात मग्न असलेला माणूस देहाचे भोग भोगताना देखील आनंदात असतो.

आपल्यालाही हा अनुभव असेल की एखाद्या कीर्तनात, भजनात, देवाच्या नामस्मरणात किंवा एखाद्या कामात जरी आपण रमलो आणि आपलं काही दुखत असेल, तरी आपण त्या क्षणी दुःख विसरतो आणि रामनामांत तल्लीन होतो.

म्हणून समर्थ सांगताहेत की मानवी जीवनासाठी भगवंताचं नामस्मरण हेच चिरंतन असं आनंददायी सुख आहे आणि त्यासाठी आपण रामनामाची साधना केली पाहिजे.  त्याच मार्गाने मार्गस्थ व्हायला हवं.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे

मोबाईल 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.