Pune : येरवडा कारागृहात मोबाईल सापडला; प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

एमपीसी न्यूज : येरवडा कारागृहातील एका शौचालयात  (Pune) मोबाईल फोन आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बरॅक क्रमांक तीन येथील शौचालयाची झडाझडती घेताना हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सागर बाजीराव पाटील (वय 38, रा. जेल वसाहत, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, येरवडा कारागृहात झाडाझडती सुरू असताना सर्कल क्रमांक 1 बरॅक क्रमांक 3 मधील शौचालयात पोलिसांना काळ्या रंगाचा नोकिया कंपनीचा मोबाईल सापडला. कर्मचाऱ्यांनी तत्काळ आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी याबाबत दोषींवर कारवाईसाठी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, हा मोबाईल नेमका कोणी ठेवला होता? त्यावरुन कोण, कोण; कोणाशी बोलले (Pune) याची माहिती घेतली जात आहे़. त्यानंतर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.