Marital harassment : माहेरहून पैसे न आणल्याने चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – विवाहितेने माहेरहून (Marital harassment) पैसे न आणल्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ केल्याची तक्रार चाकण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. हा प्रकार जानेवारी 2019 ते 30 मे 2022 या कालावधीत आंबेठाण चौक चाकण येथे घडला.

विजय अशोक कांडगे (वय 38, रा. आंबेठाण चौक, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत विवाहितेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Wakad Crime : घरातील दागिने आणि वस्तूंचा अपहार केल्याप्रकरणी पती आणि दीरा विरोधात गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने फिर्यादी विवाहीतेकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. विवाहितेने माहेरहून पैसे न आणल्याने पतीने विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत शिवीगाळ व मारहाण केली. तसेच फिर्यादी विवाहितेला जीवे (Marital harassment) मारण्याची धमकी देऊन फिर्यादी यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.