PCMC Employee Retirement : महापालिकेचे शहर अभियंता राजन पाटील यांच्यासह 98 अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे (PCMC Employee Retirement) शहर अभियंता राजन पाटील, यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. शंकर जाधव, कार्यकारी अभियंता संजय भोसले, लेखाधिकारी नानासाहेब देशमुख, माहिती तंत्रज्ञान अधिकारी श्रीधर पवार, उपअभियंता जयवंत जाधव, शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी पराग मुंढे यांच्यासह सुमारे 98 अधिकारी आणि कर्मचारी आज महापालिका सेवेतून निवृत्त झाले. 

महापालिकेच्या वतीने माहे मे 2022 अखेर सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे करण्यात आला. सेवानिवृत्ती कार्यक्रमास कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी अभिमान भोसले, उमेश बांदल, नितीन समगीर, मंगेश कलापुरे, महादेव बोत्रे, शेखर गावडे, विशाल बाणेकर, धर्मा शिंदे, लाला गाडे, नंदकुमार इंदलकर तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

राजन पाटील 1988 साली (PCMC Employee Retirement) कनिष्ठ अभियंता म्हणून महापालिका सेवेत दाखल झाले होते. उपअभियंता, कार्यकारी अभियंता, सह शहर अभियंता, शहर अभियंता पदावर त्यांनी काम केले. महापालिकेच्या 34 वर्षाच्या सेवेत पाटील यांनी विविध विभागात काम केले. महापालिका सेवेतील कार्यकाळाबाबत आपण समाधानी असल्याचे राजन पाटील यांनी सांगितले.

Commissioner of Police : पोलीस आयुक्त कार्यालयात 18 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती समारंभ

नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये शहर अभियंता राजन पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ. शंकर जाधव, कार्यकारी अभियंता संजय भोसले, लेखाधिकारी नानासाहेब देशमुख, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी श्रीधर पवार, उपअभियंता जयवंत जाधव, सहाय्यक प्रशासन अधिकारी पराग मुंढे, मुख्याध्यापिका वर्षा गणबावले, तैहसिन अत्तार, हेमलता सुक्रे, उमा पवार, नामदेव उंडे, कार्यालय अधिक्षक सुरेश पोकळे, मुख्य आरोग्य निरिक्षक चंद्रकांत रोकडे, मुख्य लिपिक अरुण जागडे, ज्ञानेश्वर केळकर, मुरलीधर शिंदे, सुनिता येवले, हारुन आतार, पुष्पा पवार, विठ्ठलराव जगताप, क्रीडा पर्यवेक्षक अशोक पटेकर, विश्वास गेंगजे, स्टाफ नर्स विजय दौंडकर, फार्मासिस्ट हलिमा शेख, ए.एन.एम. शोभा थोरात, सहाय्यक शिक्षक शोभा पाटील, मुस्ताकखान झुंबरभाई पठाण, हनुमंत इंगळे, लिपिक प्रकाश सौदागर, उपशिक्षिका माधुरी इनामदार, सुरेखा पवार, शांता गायकवाड, पोपट रणपिसे, ज्योती निरगुडे, आशा गवळी, प्रतिभा चौधरी, संगिता जाधव, महादू भवारी, पुष्पा कुदळे, मंगल उनउने, वाहनचालक रामदास गवारी, ईस्माईल मुजावर, नारायण धोत्रे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राजीव रणपिसे, आरेखक शंकर जगताप, वायरमन रावसाहेब जगदाळे, अरुण हाकाळे, नायकु मोहने, प्रमुख अग्निशमन विमोचक (लिडींग फायरमन) दिलीप कांबळे, भाऊसाहेब धराडे, सहाय्यक उद्यान निरिक्षक दत्तात्रय बोंद्रे, असिस्टंट हार्टीकल्चर सुपरवायझर सावळेराम रावते, सुरक्षा निरिक्षक हरिभाऊ खंडाळकर, जनरेटर ऑपरेटर जालिंदर केंद्रे, इलेक्ट्रीक मोटार पंप ऑपरेटर आबाजी जाधव, काशीनाथ वर्णेकर, प्लंबर तानाजी पिलाने, अनिल चिखले, फायरमन विष्णू चव्हाण, लिफ्टमन दत्तात्रय मंदिलकर, दत्तात्रय कुदळे, मुकादम किसन गजभार, लक्ष्मण बवले, सदाशिव भागवत, आनंदा आढाळगे, शिपाई रमेश खैरे, रखवालदार सोपान कदम, विलास गडहिरे, सुनिल कुदळे, भगवान सानप, शंकर सकट, बापूराव सानप, लक्ष्मण सोनके, मजूर महायान मसुरे, किसन जगताप, संभाजी तापकीर, नामदेव रेणुसे, दिलीप वाल्हेकर, शिवाजी विटकर, मल्हारी काळभोर, लक्ष्मण आढाळे, चिंधू कस्पटे, संजय चिंचवडे, रामलाल शिंगाडे, प्रकाश ताकवणे, राजाभाऊ संचेती, अरविंद गव्हाणे, तुकाराम केदारी, वॉर्ड बॉय बदाम भोसले, गुलाब सावंत, सफाई कामगार वंदना गोरे, आया विजया सोनवणे, कचरा कुली बबन मुंढे यांचा समावेश आहे.  तर स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मुकादम विकास कांबळे, सफाई सेवक अशोक भोसले यांचा समावेश आहे.

अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप म्हणाले, महापालिका (PCMC Employee Retirement) सेवेत कर्तव्य बजावणारे अधिकारी कर्मचारी ख-या अर्थाने शहराच्या प्रगतीचे शिलेदार आहेत.  शहराच्या नावलौकिकात भर पाडण्यासाठी निवृत्त होणारे अधिकारी कर्मचा-यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. निवृत्ती नंतर स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देऊन सुखी जीवन करावे.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी केले.  तर सूत्रसंचालन किरण गायकवाड यांनी केले.  आभार अभिमान भोसले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.