Maval Corona News : नवीन 90 रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसीन्यूज – मावळ तालुक्यात मंगळवारी (दि.01) 90 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 185 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही,आतापर्यंत 525 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 613 आहे.

शहरी भागात 52 रूग्ण तर ग्रामीण भागात 38 रूग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 46 रूग्ण सापडले. तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 04 रूग्ण आज सापडले.आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 02 रूग्ण आज सापडला. तालुक्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 31,470 झाली आहे. तर दिवसभरात 185 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

मंगळवारी कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात इंदोरी येथे 11 रुग्ण सापडले. तळेगाव दाभाडे (ग्रामीण)येथे 07 रूग्ण सापडले. वराळे येथे 06 रुग्ण सापडले. सोमाटणे व नवलाख उंब्रे येथे प्रत्येकी 04 रुग्ण सापडले. तर माळवाडी, कामशेत, धामणे,ब्राह्मणवाडी साते,सुदूंब्रे व बेडसे येथे प्रत्येकी 01रुग्ण सापडला.असे एकूण 38 रुग्ण सापडले.

30,332 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 10,763 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 5,052 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,537 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 17,352 रुग्ण तर ग्रामीण भागात 14,118 रुग्ण आढळून आले आहेत.

एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 96 .38 टक्के आहे तर मृत्यू दर 1.67 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 361 लोणावळा नगरपरिषदमध्ये 50 वडगाव नगरपंचायतमध्ये 23 ग्रामीण भागात 179 असे एकूण 613 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.