Maval : हिंजवडी येथील आयटी अभियंत्याचा पवना धरणात बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज – हिंजवडी येथे काम करणा-या एका आयटी (Maval) अभियंत्याचा पवना धरणात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 25) दुपारी घडली.

 

मयांक उपाध्याय (वय 27, रा. हिंजवडी फेज एक. मूळ रा. हरियाणा) (Maval)असे मृत्यू झालेल्या आयटी अभियंत्याचे नाव आहे.

Moshi : डिफेन्स एक्स्पोमध्ये निबे लिमिटेडचा म्युनिशन्स इंडिया लिमिटेड सोबत करार

याबाबत माहिती अशी की, मयांक हा हिंजवडी येथे एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत होता. तो रविवारी मावळ तालुक्यातील फांगणे येथे पवना धरण परिसरात गेला होता. धरणामध्ये गेल्यानंतर त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो धरणात बुडाला. त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.