Maval News : तालुक्यात दिवसभरात 51 नवे रुग्ण तर 83 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील रुग्णसंख्येत वाढ झाली असुन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मावळ तालुक्यात बुधवारी (दि.16) 51 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 83 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज ग्रामीण भागात रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत 458 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 594 आहे. शहरी भागात 10 तर ग्रामीण भागात41 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 09 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषद हद्दीत 01 रुग्ण सापडला, वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत एकही रुग्ण सापडला नाही.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 22,970 झाली आहे. तर दिवसभरात 83 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. बुधवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात तुंग, सुदवडी व कामशेत येथे प्रत्येकी 04, कुसगाव बुद्रुक, साते, वरसोली, सुदुंबरे व सोमाटणे प्रत्येकी 02, ब्राह्मणवाडी, (साते), भोयरे, ताजे, चांदखेड, गहुंजे, मोहितेवाडी, टाकवे बुद्रुक, मोर्वे, उकसान, पाले नामा, उर्से, मंगरूळ, टाकवे खुर्द, आंबी, माळवाडी, नवलाख उंब्रे, तळेगाव दाभाडे ग्रामीण, इंदोरी व वाकसई प्रत्येकी 01 एकूण 41 रुग्ण सापडले.

21,891 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 458 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7,345 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3,907 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1185 रुग्ण सापडले आहेत.शहरी भागात 12,437 रुग्ण तर ग्रामीण भागात 10,533 रुग्ण आढळून आले आहेत. 03 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 95.03 टक्के आहे तर मृत्यू दर 02.10 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 135 लोणावळा नगरपरिषदमध्ये40 वडगाव नगरपंचायत मध्ये 34 व ग्रामीण भागात 385 असे एकूण 594 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.