Maval News: लॉकडाऊन काळात भाजपाने केलेल्या सेवाकार्याची माहिती देणाऱ्या ई-पुस्तिकेचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – मावळ तालुका भारतीय जनता पक्षाने मार्च ते जून 2020 या कालावधीत लॉकडाऊन दरम्यान तालुक्यातील नागरिकांसाठी केलेल्या सेवाकार्याची माहिती देणाऱ्या ई-पुस्तिकेचे प्रकाशन आज माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष​ ​गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, महिला मोर्चा अध्यक्ष सायली बोत्रे, देहू शहराध्यक्ष मच्छिन्द्र परंडवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

वडगाव येथील पक्षाच्या मुख्यालयात मावळ तालुका भाजपाची मासिक बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी मावळ तालुका भाजपा किसान मोर्चा, कामगार आघाडी, ओबीसी आघाडी, धनगर समाज परिषद, मातंग समाज परिषद आदी आघाडींची कार्यकारिणी जाहीर करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच मावळ तालुका भाजपच्या चिटणीसपदी जांभूळ येथील राजू गाडे यांची आणि तालुका उपाध्यक्षपदी सावंतवाडी येथील प्रकाश सखाराम होजगे यांची निवड करण्यात आली.

देहू शहर भाजपा कार्याध्यक्षपदी रायबा मोरे व युवा मोर्चा अध्यक्षपदी अनिरुद्ध काळोखे यांची निवड करण्यात आली. पिंपरी -चिंचवड शहर भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस पदी सोनम विनायक मोरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या मासिक बैठकीस तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्त्यांसह माजी अध्यक्ष प्रशांत ढोरे, जि.प.सदस्य नितीन मराठे, सभापती निकिता घोटकुले, उपसभापती दत्तात्रय शेवाळे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, संघटनमंत्री किरण राक्षे, सरचिटणीस सुनिल चव्हाण, मच्छिन्द्र केदारी, सुमित्रा जाधव, अनंता कुडे अभिमन्यू शिंदे, नामदेव वारिंगे, विकास लिंभोरे, सचिन भांडे, सागर शिंदे, राहुल कराळे, अर्जुन पठारे, अमोल भेगडे, देविदास गायकवाड, दत्तात्रय गाडे, गणेश गायकवाड, राजू शिंदे, विकास शेलार,  धनश्री भोंडवे, गणेश कल्हाटकर, विकी म्हाळसकर, आश्विनी साठे, सीमा आहेर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.