Pune News : उपाशी ठेवून मानसिक छळ, विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज : हुंड्यासाठी मारहाण करून छळ होत असल्याने एका 21 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. फुरसुंगीतील सिद्दी ग्रीन सोसायटीत मंगळवारी ही घटना घडली. 

आरतीकुमारी सुनीलकुमार यादव (वय 21) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पती सुनीलकुमार यादव (वय 29), सासू सासरे, ननंद यांच्याविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेशकुमार राय (वय 45) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरतीकुमारी यादव ही फिर्यादी यांची पुतणी आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये तिचे सुनीलकुमार यादव याच्यासोबत लग्न झाले होते. हे पूर्व फुरसुंगीतील सिद्धी ग्रीन सोसायटीत राहत होते. लग्न झाल्यापासून आरतीकुमारी हिचा हुंड्यासाठी छळ होत होता.

हुंड्याच्या मागणीसाठी तिच्याशी भांडण करून शिवीगाळ आणि मारहाण होत होती. आरोपी उपाशी ठेवून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. या सर्व छळाला कंटाळून आरतीकुमारी हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.