Hinjawadi Crime : बसमधून उतरत असताना प्रवाशाचा मोबाईल पळवला

एमपीसी न्यूज : पीएमपी बसमधून उतरत असताना एका (Hinjawadi Crime) वृद्ध व्यक्तीचा मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 8) रात्री साडेआठ वाजता शिवाजी चौक, हिंजवडी येथे घडली.

शिवप्रसाद रंगनाथ तावरे (वय 65,रा. हिंजवडी. मूळ रा. सातारा) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad News : वंदे भारत एक्सप्रेसवर चिंचवड येथे फुलांची उधळण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तावरे हे कात्रज ते इन्फोसिस फेज एक या बसने प्रवास करीत होते. ते रात्री साडेआठ वाजता हिंजवडी मधील शिवाजी चौकात उतरत होते.(Hinjawadi News) त्यावेळी अज्ञाताने त्यांच्या खिशातून त्यांचा मोबाईल चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.