Mountaineering Club : माउंटेनिअरिंग क्लबचे सदस्य एव्हरेस्ट बेस कॅम्पसाठी नेपाळकडे रवाना

Pimpri News : पिंपरी चिंचवड माउंटेनिअरिंग क्लबचे (Mountaineering Club) 22 सदस्य एव्हरेस्ट बेस कॅम्पसाठी नेपाळकडे ट्रेकसाठी आज रवाना झाले. शहरातील इतक्या मोठ्या संख्येने अशा अवघड ट्रेकसाठी कदाचित पहिली मोहीम असल्याची शक्यता वर्तण्यात येत आहे. 

दरम्यान, यापुर्वी 2020 या वर्षी अशी  मोहीम आयोजिली करण्यात आली होती परंतु कोरोना संकटामुळे ही मोहीम  होऊ शकली नाही पण मात्र या वर्षी सर्व नियम शिथिल झाल्याने ही मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेसाठी गिर्यारोहकांनी कसून सराव केला असून याआधी कात्रज ते सिंहगड, चौराई देवी (सोमाटने फाटा) ते लोहगड हे रात्रीचे ट्रेक केले तसेच रोज पहाटे 5 वाजता घोरवडेश्वर येथे जाऊन सराव करण्यात आला. या मोहिमेआधी क्लबने माऊंट एलब्रूस, माऊंट मेरा, इ. हिमालयीन मोहीम यशस्वी केल्या आहेत.

यंदाच्या या मोहिमेत माउंटेनिअरिंग क्लबचे (Mountaineering Club in india) सदस्य एव्हरेस्ट बेस कॅम्पसाठी अखेर रवाना झाले. ही मोहीम एकूण 17 दिवसांची असून या मोहिमेत 5 महिला सदस्य आहेत तसेच 73 वय असलेले दोन सदस्य आहेत. या मोहिमेमधील सदस्य यांना क्लबचे सचिव एव्हरेस्ट वीर मा.कृष्णा ढोकले ,अध्यक्ष मा.डॉ.मिलिंद खाडिलकर यांनी या ट्रेकचे मार्गदर्शन केले आहे.

IIM Campus : महाराष्ट्राची भूमी ही नेहमीच महत्त्वाची राहिली आहे – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

दरम्यान, ही मोहिम माऊंट एलब्रूस, माऊंट मेरा या मोहिमेत सहभागी असलेले सतिश बुर्डे यांच्या नेतृत्वाखाली गेली आहे. यावेळी सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्लबचे (Mountaineering Club) उपाध्यक्ष शिवाजी शिंदे, प्रवीण वाडकर, अमृत धनगर,राहुल शेंडगे, जयंत तुपे, विनोद कांबळे, रविराज भोईटे यांनी मोहिमेतील सर्व सदस्यांना गुलाब पुष्प आणि पेढे भरवून शुभेच्छा दिल्या अशी माहिती क्लबचे खजिनदार अविनाश पिंगळे यांनी यावेळी दिली. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.