सोमवार, सप्टेंबर 26, 2022

Shrirang Barne: शहरवासीयांनो, ‘हर घर तिरंगा’ अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हा – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज : हर घर तिरंगाअभियानाअंतर्गत मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून ध्वजाचे वाटप करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त घरावर ध्वज फडकाविण्यासाठी शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्त्यांना ध्वजाचे वाटप केले.(Shrirang Barne) पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हर घर तिरंगाअभियानात सहभागी व्हावे, असे आवाहनही खासदार बारणे यांनी केले.

थेरगाव येथे झालेल्या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड शहर युवा सेना अधिकारी विश्वजीत बारणे, ज्येष्ठ नागरिक संघाचे विलास जगदाळे, नंदू सुतार, विजय पाटील, नंदू जाधव, बाळासाहेब वाघमोडे, हनुमंत माळी, सुरेश राक्षे, माउली घोगरे, गणेश खानेकर, राजू शेख, शशी कात्रे, निलेश पिंगळे, सुरज बारणे, विक्रम झेंडे, अक्षय परदेशी, मंदार येळवंडे, ओंकार पुजारी, योगेश साठे, प्रमोद चव्हाण, उमेश रजपूत आदी कार्यकर्ते व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

Pune Gambling raid: पुणे स्टेशनजवळील जुगार अड्ड्यांवर छापा 19 जणांविरोधात गुन्हा दाखल

खासदार बारणे म्हणाले, ”भारत यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्याच्या निमित्ताने सरकारद्वारे वेगवेगळे उपक्रम, मोहिमा राबविल्या जात आहेत.(Shrirang Barne) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा अभियानाची घोषणा केली आहे. हर घर तिरंगा अभियानाचा मुळ उद्देश देशातील नागरिकांच्या मनात देशभक्ती जागृक करणे हा आहे”.

”स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने हे अभियान राबवले जात आहे. याचा उद्देश लोकांच्या मनात देशभक्ती जागृक करणे आणि राष्ट्रध्वजाबाबत जागृकता वाढवणे आहे.(Shrirang Barne) या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा. मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी व्हावे”, असे आवाहनही खासदार बारणे यांनी केले.

 

spot_img
Latest news
Related news