MPSC Exam : MPSC च्या तीन परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जानेवारी महिन्यात घेतल्या जाणाऱ्या तीन परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर झालं आहे. एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता एमपीएससीमार्फत सुधारीत वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे.

एमपीएससीमार्फत जानेवारी, 2022 मध्ये नियोजित तीन परीक्षांच्या सुधारित दिनांकाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. दोन जानेवारी 2022 रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 आता 23 जानेवारी रोजी होणार आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा -2020 संयुक्त पेपर क्रमांक 1 आता 29 जानेवारीला होणार आहे. आधी ही परीक्षा 22 जानेवारी रोजी होणार होती, तर महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा 2020, पेपर क्रमांक 2 ,पोलिस उपनिरीक्षक परीक्षा आता 30 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा 29 जानेवारी रोजी होणार होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.