Chinchwad News : हिंजवडी, भोसरी, थेरगावमधून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीचा सपाटा सुरु आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला तीन वाहने चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. हिंजवडी, भोसरी आणि थेरगाव मधून तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी रविवारी (दि. 2) हिंजवडी, भोसरी एमआयडीसी आणि वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अभिषेक अपूर्व कुमार कुंडू (वय 29, रा. ब्लूरिज सोसायटी, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांची एक लाख 20 हजार रुपये किमतीची दुचाकी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांची दुचाकी चोरून नेली. ही घटना 1 जानेवारी 2022 रोजी उघडकीस आली.

प्रशांत मोहन पांढरपट्टे (वय 46, थेरगाव) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांनी त्यांची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी इंद्रायणीनगर येथे एका बॅंकेच्या समोरील पार्किंगमध्ये पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीची दुचाकी चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 1) दुपारी पावणेदोन ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत घडली.

शशिकांत माधवराव मिरकले (वय 31, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीच्या मामाच्या मुलाच्या नावावर असलेली 15 हजार रुपये किमतीची दुचाकी फिर्यादीने थेरगाव येथे सार्वजनिक रस्त्यालगत पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. ही घटना 24 डिसेंबर 2021 रोजी दुपारी सव्वादोन ते तीन या कालावधीत घडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.