शनिवार, ऑगस्ट 20, 2022

Nigdi News : महापालिकेची अनधिकृत बांधकामावरील कारवाई सुरूच

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विरोधी पथकामार्फत फ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत दुर्गा नगर ते थरमॅक्स चौक या ठिकाणी 42 पत्राशेडवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी (दि.26) करण्यात आली.

मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि बी.आर.टी. रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत अनधिकृतपने उभारण्यात आलेले हॉटेल्स, दुकाने, टपऱ्या अशा एकूण 67250 चौरस फुट इतक्या क्षेत्रावर ही कारवाई करण्यात आली.

महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या आदेशान्वये क्षेत्रीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त सीताराम बहुरे, अण्णा बोदडे यांच्या नियंत्रणात कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे यांच्या उपस्थितीत अ, क, ई आणि फ क्षेत्रीय कार्यालयांच्या संयुक्त अतिक्रमण विरोधी पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली.

याकामी पथक बीट निरीक्षक, पोलीस निरीक्षक, 5 पोलीस उप निरीक्षक, 100 पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे 125 कर्मचारी यांच्यासह 3 जे.सी.बी, 1 पोकलेन, 1 क्रेन आणि इतर वाहने तैनात होती. अतिक्रमण विरोधी कारवाई करत असताना नागरिकांनी स्वत:हून दुकानातील सामान काढून घेत सहकार्याची भूमिका घेतल्याने संपूर्ण कारवाई शांततेत पार पडली.

spot_img
Latest news
Related news