Pimpri News: महापालिका स्थायी समितीची 36 कोटींच्या विकास कामांना मान्यता

 एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या येणा-या आणि झालेल्या सुमारे 36 कोटी  51 लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

क्षेत्रिय कार्यालय हद्दीतील मलनि:सारण नलिका मॅनहोल चेंबर्सची साफसफाई यांत्रिकी पध्दतीने करण्यासाठी येणा-या 1 कोटी 29 लाख,  प्रभाग क्रमांक 6 मधील चक्रपाणी वसाहत, देवकर वस्ती व परिसरात स्थापत्य विषयक सुधारणा कामे करण्यासाठी येणा-या 40 लाख, पिंपळे सौदागर आरक्षण क्र. 371 ब येथील उद्यानात स्थापत्य विषयक कामे  आणि इतर अनुषंगिक कामे करण्याकामी येणा-या 52 लाख 30 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.9 मधील गांधीनगर, नुरमोहल्ला, जैन मंदिर, ज्योती इंग्लिश स्कूल, वसंतदादा पाटील परिसरातील रस्त्यांची हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी येणा-या 40 लाख 38 हजार, मासुळकर कॉलनी, यशवंतनगर, उद्यमनगर परिसरातील रस्त्यांची हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्याकामी येणा-या 40 लाख 61 हजार इतक्या, तर खराळवाडी, नेहरुनगर  व इतर भागातील ठिकठिकाणी रस्त्यांची हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्याकामी येणा-या 40 लाख 50 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

राष्ट्रीय हरीत लवाद  यांचे आदेशाचे अनुषंगाने पिंपरी- चिंचवड महापालिकेमार्फत शेवाळेवाडी ग्रांमपंचायत, ता हवेली यांना 10, 000 लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टँकरच्या दैनंदिन पाच ट्रिप्स देण्याकामी येणा-या 26 लाख 76 हजार इतक्या खर्चास आणि अ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. 10 मध्ये दिवाबत्ती व्यवस्थेचे नुतनीकरण करण्यासाठी येणा-या 32 लाख 37 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.