Nigdi Crime News : पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – मित्राने घरी येऊन बाहेर फिरायला जाऊ म्हणून अल्पवयीन मुलाला घराबाहेर आणले. त्यानंतर चार जणांनी मिळून अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला, तसेच परिसरात दहशत माजवली. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 28) रात्री साडेनऊच्या सुमारास ओटास्किम, निगडी येथे घडली.

याप्रकरणी दीपक पवार (वय 22, रा. ओटास्किम, निगडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहानवाज मुस्ताक शेख (वय 17, रा. ओटास्किम, निगडी) असे जखमी मुलाचे नाव आहे. यासंदर्भात त्याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख हा घरी असताना शेख याचा एक अल्पवयीन मित्र घरी आला. त्याने ‘बाहेर फिरायला जाऊ’ असे म्हणून फिर्यादीला घराबाहेर नेले. अंकुश चौक येथील भाजी मंडईच्या पाठीमागे नेत मित्राने आणि त्याच्या तीन साथीदारांनी मिळून जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

दरम्यान, दीपक पवार याने कोयत्याने डोक्यात मारून फिर्यादीवर खुनी हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर आरोपींनी भाजी मंडई परिसरात दहशत निर्माण केली. त्या दहशतीमुळे लोकांनी त्यांची दुकाने व टप-या बंद केल्या. याप्रकरणी निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.