Chinchwad News : भरदिवसा घरफोडी करून दहा लाखांचे दागिने, रोकड लंपास

एमपीसी न्यूज – भर दिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्याने नऊ लाख 95 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. ही घटना बुधवारी (दि. 29) दुपारी दळवीनगर, चिंचवड येथे घडली.

केतन विलास वाडेकर (वय 40, रा. दळवीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराच्या बाहेरील लोखंडी ग्रीलच्या आतील कडीला अडकवलेल्या चावीच्या साहाय्याने घराचा मुख्य दरवाजा उघडला. त्यानंतर घरात प्रवेश करून घरातून 14.5 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 9 लाख 95 हजारांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार भर दिवसा घडला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.