Pune News : मैत्रिणीविषयी अपशब्द काढल्याने दांडक्याने मारहाण करून तरुणाचा खून

0

एमपीसी न्यूज : शनिवारी पहाटे सिंहगड रस्त्यावरील नांदेड जवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. मैत्रिणीविषयी अपशब्द काढल्याचा रागातून हा खून करण्यात आला. यश मिलिंद कांबळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शनिवारी पहाटेच्या सुमारास यश कांबळे याचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती.

पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. मयत यश कांबळे याने एक आरोपीच्या मैत्रिणी विषयी अपशब्द काढले होते. याच रागातून चारही आरोपींनी त्याला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली होती. याच मारहाणीत यश चा मृत्यू झाला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.