Parali Crime News : रेल्वेत विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी एनसीबीच्या अधिकाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – रेल्वेत प्रवास करत असताना एका विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी एनसीबीच्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. उदगीर-लातूर रोड दरम्यान एका विद्यार्थिनीची छेडछाड करण्यात आल्याचा प्रकार हैदराबाद-हडपसर रेल्वे गाडीमध्ये रात्री घडला. याप्रकरणी विद्यार्थिनीने तक्रार दाखल केली. त्यानुसार अधिका-याला परळी रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दिनेश अंकुश चव्हाण असे या अधिका-याचे नाव आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध परळी येथील जीआरपी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 354, 509 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की काल रात्री हैदराबाद-हडपसर या रेल्वेने एनसीबीचा एक अधिकारी आणि एक विद्यार्थिनी प्रवास करीत असताना त्या अधिकाऱ्याने विद्यार्थिनीची छेड काढली. त्यानुसार विद्यार्थिनीने रेल्वे पोलिसाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यावरून आरोपीस परळी रेल्वेच्या जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार लातूर रोड दरम्यान घडला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.