Pimple Saudagar News: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नाना काटे यांच्या घरी सदिच्छा भेट

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांना सदिच्छा भेट दिली. पवारसाहेबांनी घरी भेट दिल्याने काटे परिवाराने आनंद व्यक्त केला.

आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार दोन दिवस पिंपरी-चिंचवडच्या दौ-यावर होते. शनिवारी आजी-माजी नगरसेवकांची बैठक तर रविवारी कार्यकर्ता मेळावा झाला. रहाटणीतील मेळाव्याला जाणा-यापूर्वी त्यांनी पिंपळेसौदागर येथील नाना काटे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.

काटे परिवाराने श्री तिरुपती बालाजीची मूर्ती देऊन पवार यांचा सत्कार केला. नाना काटे, नगरसेविका शीतल काटे, माजी नगरसेवक शंकर काटे, उद्योजक नंदकुमार काटे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

”पक्षाचे प्रमुख आपल्या घरी यावेत. प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे स्वप्न असते. पवार साहेबांनी आमच्या घरी भेट दिल्याने खूप आनंद झाला. एक वेगळी उर्जा मिळाली” असे नाना काटे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.