Vadgaon Maval : गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे थाळीनाद आंदोलन

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सूचनेनुसार, आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली, मावळ तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुवर्णा राऊत यांच्या नेतृत्वाखाली वडगाव मावळ येथील पंचायत समिती चौकात थाळी नाद आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदींचा पूतळा करून त्यांच्या कानामध्ये थाळी नाद करण्यात आला. राष्ट्रवादीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

गॅस- सिलेंडर दरवाढ तब्बल 15 रुपयांनी झाली आहे. गॅस सिलेंडरचे दर एक हजार रूपयांच्या घरात गेली आहे. या वाढलेल्या महागाई विरोधात आज गुरूवार (दि 8) तहसीलदार कार्यालय वडगाव मावळ येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. मोदींचा पुतळा करून त्यांच्या कानामध्ये थाळी नाद करण्यात आला. दरम्यान मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे यांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात रुपाली दाभाडे, वैशाली दाभाडे, सविता भांगरे, शशिकला सातकर, रजंना सातकर, उमा शेळके, सोनी गिल,आरती घारे,शैलजा काळोखे, सविता मंचरे, मंगल मु-हे, लक्ष्मी खराडे, सुप्रिया पिंजण, पुनम लगाडे, मिनाक्षी ढोरे, कांचन ढमाले,उर्मिला धामणकर, सुवर्णा घोलप, मनिषा भसे, मुक्ता पवार, मनिषा आंबेकर, मेघा दहीभाते, मालती केदारी, ज्योती शिंदे,शिवानी सोनवणे, विणा करंडे, हेमा रेड्डी, कनिका घुले, जिज्ञासा चांदेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

या आंदोलनादरम्यान जोरदार घोषणा देऊन केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.