Khadki News : इंद्रायणी स्पोर्टस क्लबकडून एनडीए युथचा धुव्वा ;  एकतर्फी विजयासह पटकावला छत्रपती महाराज चषक

एमपीसी न्यूज – खडकी येथील खडकीयन्स स्पोर्टस क्लबच्या वतीने शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत देहूरोड येथील इंद्रयणी स्पोर्ट्स क्लबने एनडीए युथ संघाचा 7- 1गोलने पराभव करीत दणदणीत विजय मिळविला. (Khadki News) या संघाला खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद आणि  पूजा आनंद यांच्या हस्ते 15 हजारांचे रोख बक्षीस, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

दरम्यान,  इंद्रयणी स्पोर्ट्स क्लबचा या हंगामातील हा चौथा विजय आहे. त्यामुळे या संघावर फुटबॉल प्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रीय फुटबॉलपटू आलोक शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रायणी स्पोर्ट्स क्लबने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.

Chakan Crime : अपहरण झालेल्या सहा वर्षांच्या मुलाची चाकण पोलिसांनी केली सुखरुप सुटका

खडकीयन्स स्पोर्टस क्लबच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत एनडीए युथ संघाचा दणदणीत पराभव केला. इंद्रायणीच्या फुटबॉलपटूंनी 7 गोल केले तर एनडीए युथच्या खेळाडूंना केवळ एकच गोल करता आला. इंद्रयणीच्या वतीने सुरज बहिरट याने सर्वाधिक तीन गोल केले.(Khadki News) तर आकाश गायकवाड याने दोन आणि मार्कंड हरदेव व जीवन रावत याने प्रत्येकी एक गोल नोंदवून संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची  भूमिका पार पाडली.

दरम्यान, प्रतिष्ठेच्या सामन्यात इंद्रायणी स्पोर्ट्स क्लबने मिळविलेल्या विजयाबद्दल या संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.  शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख निलेश तरस, युवा सेनेचे उपशहर अधिकारी राजेंद्र तरस,  मनसेचे मावळ तालुका उपाध्यक्ष मोझेस दास,  उप तालुकाध्यक्ष भरत बोडके, ठाकरे गटातील मावळ युवा सेनेचे उपतालुका अधिकारी विशाल दांगट पाटील, भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे देहूरोड शहराध्यक्ष जाफर शेख, व्यावसायिक सोहेल शेख, सुनील बन्सल, नंदकुमार गुराळ आदींनी इंद्रायणी स्पोर्ट्स क्लबचे कौतूक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.