गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022

Nirmala Sitharaman : साउथचा सिनेमा समजतो तर माझी भाषाही समजेल; निर्मला सीतारामन यांचा शरद पवारांना टोला

एमपीसी न्यूज : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. भाजपच्या मिशन बारामती या मोहिमेंतर्गत त्यांचा हा तीन दिवसांचा दौरा आहे. त्यांच्या या दौऱ्यावरूनच जेष्ठ नेते शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना ग्रामीण भागातील जनतेला त्यांची भाषा सहजपणे समजेल असा टोला लगावला होता. त्यावर आता निर्मला सीतारामन यांनीच प्रत्युत्तर दिला आहे. बारामतीच्या जनतेला साउथ सिनेमा समजतो, तर माझी भाषाही समजेल असं म्हणत त्यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले. 
निर्मला सीतारामन म्हणाल्या, बारामतीच्या जनतेला भाषा समजावण्याची गरज नाही. साउथ सिनेमा आपल्याला समजतो. पश्चिम बंगाल आणि देशाच्या इतर काही भागातून नेते येतात, त्याची भाषा समजते. त्यामुळे बारामतीच्या लोकांना माझी भाषाही समजेल, त्यामुळे मला चिंता नाही असं म्हणत सितारामन यांनी पवारांना हळूच चिमटा घेतला.
सितारामन म्हणाल्या, राष्ट्रवादीला टार्गेट करण्यासाठी मी बारामतीत जाणार नाही. भारतीय जनता पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी मी बारामतीचा दौरा करत आहे. संपूर्ण भारतातच भाजपने लक्ष घातले आहे. फक्त बारामतीत नाही; हे तुम्ही लक्षात ठेवायला हवं असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.
सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये गेल्यानंतर (Nirmala Sitharaman) ईडीची चौकशी होत नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यावर निर्मला सीतारामन यांनी खोचक भाषेत प्रत्युत्तर दिले. ईडीचा आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा काहीही संबंध नाही. मनी लॉंडरिंग असेल किंवा काही संशयास्पद असेल अशाच केसमध्ये ईडी येत असते. ईडी अशीच कुठेही पोहोचत नाही असं म्हणत त्यांनी सुप्रिया सुळे यांना देखील प्रत्युत्तर दिले.
spot_img
Latest news
Related news