Pimpri : मटका खेळणा-या चाैघांवर गुन्हा; सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज  : सार्वजनिक रस्त्यावर सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यात 28 हजार 350 रुपयांची रोख रक्कम, मोबाइल व दुचाकी असा एकूण 75 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी येथे सोमवारी (दि. 2) पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली.

मनोज इंगळे, असे मटका जुगार अड्डा चालक व मालकाचे नाव आहे. त्याच्यासह इतर चार जणांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सहकारी बँकेच्या समोर सार्वजनिक डांबरी रस्त्यावर काहीजण कल्याण मटका जुगार खेळत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. मटका चालक आरोपी इंगळे याने लोकांना एकत्र बसवून गर्दी केली होती. कोरोनाचा संसर्ग होऊन मानवी सुरक्षितता धोक्यात येईल असे कृत्य केले.

कल्याण मटका जुगार खेळताना व खेळविताना आरोपी मिळून आला. या कारवाईत मटका खेळविण्याच्या कागदी चिठ्ठ्या, 28 हजार 350 रुपयांच्या रोकडसह 12 हजारांचा एक मोबाइल व 35 हजारांची एक दुचाकी असा एकूण 75 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

ही कामगिरी सामाजिक सुरक्षा पथकाचे विशेष अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, सहायक फौजदार विजय कांबळे, पोलीस कर्मचारी सुनील शिरसाट, भगवंता मुठे, नितीन लोंढे, अनिल महाजन, अमोल शिंदे, वैष्णवी गावडे, मारुती करचुंडे, राजेश कोकाटे, गणेश कारोटे, योगेश तिडके यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.