Pune News : दोन वर्ष तडीपार असलेल्या आरोपीला चोरीच्या दुचाकीसह अटक 

एमपीसी न्यूज – दोन वर्ष तडीपार असलेल्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी सोमवारी (दि.2) अटक केली आहे. त्याने बंडगार्डन परिसरात एक दुचाकी चोरी तर, बिबवेवाडी परिसरात एक घरफोडीचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. त्याच्याजवळून चोरीची एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. 

सुजित सुनिल शेळके ( वय 24, रा. विश्वकर्मा गॅरेजमागे दांडेकर पुल, समर्थ वॉशिंगसेटर पाठीमागे पुणे ) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी चोरीच्या दुचाकीवरून कात्रज चौकाच्या दिशेने जात असताना पोलीसांना दिसला. संशयीत वाटल्याने त्याला थांबवून त्याच्याजवळील दुचाकीची चौकशी केली असता त्यांने दुचाकी ससुन हॉस्पीटलच्या मेन गेटजवळून चोरी केल्याचे कबुल केले. अटक आरोपी पुणे शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार असून त्याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.