Pune News: नंदकिशोर कल्चरल सोसायटीच्या वतीने पं. बिरजू महाराज यांना नृत्याद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली*

एमपीसी न्यूज: नंदकिशोर कल्चरल सोसायटीच्या वतीने यमुनानगर, निगडी येथे गुरू पद्मविभूषण पं. बिरजू महाराज यांना नृत्याद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य असे होते की, पं. बिरजू महाराज यांच्या स्वरचित नृत्यरचनांवर, वय वर्ष 4 ते वय वर्ष 40 अशा 25 विद्यार्थ्यांनी कथक नृत्य सादर करून पं. बिरजू महाराज जींना आदरांजली वाहिली.

https://www.youtube.com/watch?v=nEinD0NNvpM

प्रारंभी, डॉ.पं. नंदकिशोर कपोते यांना त्यांच्या ज्येष्ठ शिष्यांनी पं. बिरजू महाराजांची प्रतिमा भेट दिली त्याचे अनावरण करण्यात आले. त्यांनंतर डॉ. कपोते यांच्या ज्येष्ठ शिष्या भावना सामंत, ऋतुजा साळवे, श्रीनिधी जोशी, समृद्धी कुलकर्णी, प्रज्ञा शिंदे, अपूर्वा नीला, अनुष्का सामंत यांनी पं. बिरजू महाराज यांनी गायलेली गुरुवंदना सादर केली. त्यानंतर वय वर्ष ४ ते ६ अशा विद्यार्थ्यांनी महाराज जींनी लहान मुलांसाठी तयार केलेल्या “सबजी पुरी और कचोरी” व “धनिया मिरची” अशा सुंदर – सुंदर तिहाई सादर केल्या यात रीपांक्षी, मुद्रा,स्वरा , मैथिली, रोमा, समीक्षा, वैष्णवी स्वरा, उर्वी, प्रेक्षा, यांनी भाग घेतला. त्यानंतर, थोड्या मोठ्या १०-१६ वयोगटातील विद्यार्थिनींनी अदिती, जान्हवी, सुजाता,राधा, लविष्का, आरवी, गायत्री आसवार यांनी हस्तसंचालन, भाव व पदन्यास सादर केला. यानंतर ज्येष्ठ विद्यार्थिनींनी महाराज जींनी स्वतः गायलेल्या विविध नृत्यरचना सादर करून आदरांजली वाहिली. तसेच, डॉ. पं.नंदकिशर कापोते यांनी त्यांचे गुरू पं. बिरजू महाराज यांच्या विविध आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली.

कार्यक्रमास तबला साथ यश त्रिशरन व रुची जाधव यांनी केली तर संवादिनी साथ अक्षय येंडे यांनी केली. कार्यक्रमाचे निवेदन अनुष्का सामंत यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.