Maval News नकॊ नकॊ हा विध्वंस!! मला वाचवा.भंडारा डोंगराची आर्त हाक..श्री क्षेत्र भंडारा डोंगर कचऱ्याच्या विळख्यात

एमपीसी न्यूज (श्याम मालपोटे) 

श्रीक्षेत्र भंडारा डोंगर कचऱ्याच्या  विळख्यात अडकला आहे. संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षापूर्वीच समाजाला साद घातली की, वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे। पण  पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजाला दिलाच्या  पवित्र ठिकाणी भारतच नव्हे तर जगभरातून संत साहित्याचे अभ्यास करण्यासाठी भक्तजन येत असतात, प्रेरणा घेऊन जातात मात्र अशा भंडारा डोंगर पायथ्याला पूर्णपणे प्लास्टिक कचऱ्याने  ग्रासले आहे. टाकाऊ वस्तूंचा विळखा पडला आहे. 

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पाऊलखुणा ज्या डोंगरावर आहेत त्याच ठिकाणी साम्राज्य पसरले आहे. तुकाराम बीज उत्सव जवळ येत आहे, राज्यभरातून वारकरी देहू व भंडारा डोंगरावर दर्शनांसाठी येतात. त्या अगोदर येथील कचऱ्याची  विल्हेवाट प्रशासनाने लावावी अशी मागणी इंदोरी, सुदवडी ग्रामस्थांनी केली आहे.

“पुढाऱ्यांनी निवडणुकांवेळी एकीकडे मोठमोठ्या विकासाच्या बाता मारायच्या अन दुसरीकडे स्वच्छतेबाबत काना  डोळा करायचा अशी संतंप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

“संतांच्या उपदॆशाकडॆ पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे आज ही अवस्था झाली आहे व पर्यावरण संवर्धक संतानी सतत निसर्गाची आठवण ठेवलेली आहे व त्याचा विसर आज सर्वांना होत आहे.  निसर्गाला  हानी पोहोचवणं म्हणजे आहे. संत सज्जनांनी दिलेल्या विचारांना फाटा देणे होय.” असं मत पर्यावरण प्रेमी तुकाराम आगळमे यांनी व्यक्त  केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.