Pune News : नवऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून कडकडून चावा घेत बोट तोडले

एमपीसी न्यूज : नवऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका 45 वर्षीय महिलेने 36 वर्षीय तरुणाचा कडकडून चावा घेत त्याचे बोट तोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी एका 36 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली असून 45 वर्षीय महिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक केली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की आरोपी आणि फिर्यादी भवानी पेठेत शेजारी शेजारी राहतात. त्यातील आरोपी असलेल्या 45 वर्षीय महिलेला आपल्या पतीचे आणि फिर्यादीच्या आईचे आणि तिचा संबंध असल्याचा संशय होता. याच कारणावरून रविवारी सायंकाळी त्यांच्यात भांडण सुरू होते. फिर्यादी तरुण मध्यस्थी करण्यासाठी गेला असता या महिलेने त्याच्या हाताच्या मधल्या बोटाचा कडकडून चावा घेतला. यामध्ये फिर्यादी तरुणाच्या बोटाचा जागेवरच तुकडा पडला.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी महिलेला अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.