Dapodi Crime News : घरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकजण अटकेत अटक

एमपीसी न्यूज – महिलेशी हुज्जत घालत तिच्या घरात घुसून तिच्याशी गैरवर्तन केले. पीडित महिलेच्या आईने आणि एका व्यक्तीने आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्या दोघांनाही शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच महिलेचा विनयभंग केला. ही घटना बुधवारी (दि. 6) रात्री दापोडी येथे सार्वजनिक ठिकाणी आणि गुरुवारी (दि. 7) मध्यरात्री साडेबारा वाजता महिलेच्या घरात दापोडी येथे घडली.

पिंटू उर्फ शंकर विठ्ठल शेंडगे (वय 35, रा. फुलेनगर, दापोडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी 28 वर्षीय पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेशी अश्लील शब्दात बोलून ‘तुला काय करायचे ते कर. तुला सोडणार नाही’ अशी धमकी देत आरोपी फिर्यादी यांच्या घरात आला. त्यावेळी फिर्यादी महिलेची आई आणि एका व्यक्तीने आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्या दोघांनाही शिवीगाळ करत मारहाण केली.

दोघांना मारहाण करणा-यांना आरोपीच्या तावडीतून सोडविण्यासाठी फिर्यादी गेल्या असता आरोपीने महिलेशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला, तसेच पाहून घेण्याची धमकी दिली. आरोपीने फिर्यादी महिलेचा पाठलाग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक कदम तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.