Chinchwad Crime News : पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून एकाने घरात घुसून तरुणीचा विनयभंग केला तसेच तिच्या आईला शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 11) दुपारी चिंचवड येथे घडली.

सुनील परशुराम कांबळे (वय 24, रा. नागसेन नगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी 19 वर्षीय तरुणीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास फिर्यादी तरुणी आणि तिची आई घरी होत्या. त्यावेळी आरोपी सुनील कांबळे तिथे आला. फिर्यादी तरुणी आणि तिच्या बहिणीने आरोपी कांबळे याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली होती. त्याचा राग आरोपीच्या मनात होता.

त्यातून आरोपीने फिर्यादीच्या आईला ‘मी तुझ्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणार आहे’ असे म्हणत फिर्यादी तरुणी सोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला तसेच फिर्यादीच्या आईला शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. फिर्यादी तरुणीच्या भावाला मारून टाकतो, अशी धमकी आरोपीने दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक व्यंकट पोटे याप्रकरणी तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.