Pune Crime News: खळबळजनक ! बेसबॉल आणि दगडाने ठेचून बापलेकाचा खून

एमपीसी न्यूज – पुण्यातील लोणीकंद परिसरातून आज संध्याकाळी एक भीषण प्रकार उघडकीस आलाय. कोयता, दगड आणि बेसबॉलने ठेचून बाप लेकाचा खून करण्यात आला. आज सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणीकंद पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सनी कुमार शिंदे (वय 22) आणि कुमार शिंदे (वय 55) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. एका खून प्रकरणात सनी शिंदे हा कारागृहात होता. तीन महिन्यांपूर्वी जामिनावर सुटून तो बाहेर आला होता. दरम्यान आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी सनीला गाठले आणि कोयता, बेसबॉलने मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान कुमार शिंदे हे मुलाला वाचवण्यासाठी मध्ये गेले असता आरोपींनी त्यांच्यावर देखील हल्ला केला.

हल्लेखोरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सनी शिंदे आणि कुमार शिंदे यांचा यामध्ये मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यातील आरोपींची नावे निष्पन्न झाली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे. या दोघांचाही खून झाला असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.