Pimpri Crime News : महिलेचे एडिट केलेले अश्लील फोटो व्हॉट्सअपवर पाठवून बदनामीची धमकी

एमपीसी न्यूज – महिलेचे एडिट केलेले अश्लील फोटो व्हॉट्सअपवर पाठवून शिवीगाळ करुन बदनामीची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार गुरुवारी (दि.26) सकाळी सव्वा दहा ते सव्वा अकराच्या सुमारास खराळवाडी, पिंपरी येथे घडला.

याप्रकरणी पिडीत महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एका अनोळखी महिलेविरोधात माहिती तंत्रज्ञान अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी महिलेने एका मोबाईल नंबरवरुन फिर्यादी यांच्या तोंड ओळखीच्या महिला व त्यांचे एडिट केले अश्लील फोटोज व्हॉट्सअपवर पाठविले. फिर्यादी यांना शिवीगाळ केली. बदनामीची धमकी दिली. साक्षीदार यांचे अश्लील फोटोज फिर्यादी यांना पाठवून त्यांचीही बदनामी केली असे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.