Pune Crime News : ‘ती’ लाॅजवर आली नाही म्हणून केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

एमपीसी न्यूज – लॉजवर भेटण्यासाठी नकार देणाऱ्या विवाहित महिलेचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ एका व्यक्तीने व्हाट्सअॅपवर स्टेटस म्हणून ठेवले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित महिलेने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दिली. त्यानुसार बारामती पोलिस ठाण्यात आरोपी लक्ष्मण मच्छिंद्र वीर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, बारामती तालुक्यातील सांगवी परिसरात ही 26 वर्षीय तक्रारदार महिला राहते. काही दिवसांपूर्वी आरोपी आपल्या बहिणीला भेटण्यासाठी सांगवी परिसरात आला होता. आरोपीच्या बहिणीच्या घराशेजारीच पीडित महिलेचे घर आहे. यावेळी या दोघांची ओळख झाली होती. महिलेचा पती कामाला गेल्यानंतर आरोपी घरी जायला लागला आणि यातूनच त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी विवाहितेच्या घरी आणि लॉजवर दोघे भेटत राहिले. दरम्यान आरोपीने चुकून दोघांच्या शरीरसंबंधाचे फोटो आणि व्हिडिओ काढले होते.

Chakan Crime News : दुचाकीसह रोख रक्कम जबरदस्तीने चोरली

फेब्रुवारी 2022 मध्ये आरोपी आपल्या गावी निघून गेला. त्यानंतर त्यांनी एप्रिल महिन्यात फिर्यादी महिलेला फोन करून लॉजवर भेटण्यासाठी बोलावले, तिने त्याला नकार दिला असता आरोपीने त्याच दिवशी दोघांचे नग्न फोटो तिला पाठवले. जर भेटण्यासाठी आली नाही तर हे फोटो पतीला आणि भावाला पाठवेन अशी धमकी दिली. परंतु तरीही फिर्यादीने त्याला दाद दिली नाही. त्यानंतर आरोपीने 27 मे रोजी या दोघांचे विवस्त्र अवस्थेतील फोटो स्वतःच्या व्हाट्सअप ला ठेवले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.