Pune MHADA : पुणे म्हाडाच्या पाच हजार सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू

एमपीसी न्यूज –  पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे (Pune MHADA) विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत पाच हजार 69 सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी, अर्ज भरणा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील या विविध गृहनिर्माण योजनांचा शुभारंभ आज (दि. 10 जून) गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते गो – लाईव्ह कार्यक्रमाअंतर्गत करण्यात आला. दरम्यान, पुणे मंडळाच्या गृहनिर्माण भवन, आगरकर नगर या ठिकाणी 29 जुलै रोजी प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत काढून सदनिकांचे वितरण करता येणार आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी नेमके काय करायला हवे?

  • सदनिकांच्या सोडत प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी नियमावली तयार करण्यात आलेली असून मार्गदर्शक पुस्तिकेत त्या नमूद करण्यात आलेल्या आहेत. प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याआधी नियमावली वाचणे आवश्यक आहे.
  • सदर पुस्तिका https://lottery.mhada.gov.in म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • नियमावली वाचून, समजून अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन पुणे मंडळाकडून करण्यात आले आहे.

PM – KUSUM : तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पंतप्रधान कुसुम योजनेचा प्रभावीपणे प्रचार प्रसार करा- नितीन राऊत

प्रक्रियेचे स्वरूप –

  • पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या (Pune MHADA) अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला काल (दि. 09 जून) सुरूवात झाली असून 09 जुलै संध्याकाळी 5 पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.
  • नोंदणीकृत अर्जदारांची अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला आज सकाळी 10 पासून सुरू होणार असून 10 जुलै रात्री 11.59 पर्यंत नोंदणी करता येणार आहे.
  • 11 जुलै रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाईन अनामत रक्कम स्विकारली जाणार आहे.
  • 12 जुलै रोजी अर्जदाराला अनामत रक्कम संबंधित बॅंकेच्या कार्यालयीन वेळेत RTGS / NEFT द्वारे भरणा करायचा आहे.
  • स्वीकृत यादीची प्रसिद्धी 21 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर केली जाणार आहे.
  • प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत काढून सदनिकांचे वितरण 29 जुलै रोजी पुणे मंडळाच्या गृहनिर्माण भवन, आगरकर नगर या ठिकाणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाकडून (Pune MHADA) कोणताच प्राॅपर्टी एजंट, सल्लागार किंवा प्रतिनिधी नेमलेला नाही, त्यामुळे कुठल्याच अर्जदाराने यासंदर्भात परस्पर व्यवहार करू नये, तसे केल्यास पुणे मंडळ कुठल्याच फसवणूकीस/ व्यवहारास जबाबदार राहणार नाही असे म्हाडाकडून आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.