Talegaon Dabhade News : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेच्या वतीने बाल व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेच्या वतीने येत्या 15 मे ते 25 मे दरम्यान बाल व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सेवाधाम वाचनालय येथे 11 ते दुपारी 4 या वेळेमध्ये होणार असल्याची माहिती शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी दिली.

या बाल व्यक्तिमत्व विकास शिबिरामध्ये प्रसंग नाट्य, नाट्यछटा, नृत्य, मुलाखतीचे तंत्र आणि मंत्र, संगीत कथाकथन, पपेट शो, हस्तकला, खेळ, चित्रकला, निर्णयक्षमता, माइक वरील संभाषण, समस्या निवारण, ऑनलाइन ब्लॉगिंग आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या शिबिराचे उद्घाटन शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांच्या हस्ते होणार असून, यावेळी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते गणेश काकडे उपस्थित राहणार आहेत.

या बाल व्यक्तिमत्व विकास शिबिरामध्ये जास्तीत जास्त बालकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन धोत्रे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.