Pimpri News : क्षयरोगावर मात करणे ही काळाची गरज – डॉ. पवन साळवे

एमपीसी न्यूज –  “क्षयरोगावर मात करणे ही काळाची गरज असुन उपचारामार्फत रुग्णांना सेवा पुरविणे हे महान कार्य आहे”, असे मत महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी तथा वैद्यकिय संचालक डॉ. पवन साळवे यांनी व्यक्त केले.

जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने शहर क्षयरोग केंद्र यांच्या वतिने डॉ. डी वाय पाटील मेडिकल कॉलेज, जुनी इमारत येथील सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र शासनाचे स्टेट टीबी ट्रेनिंग अॅंड डेमोन्सट्रेशन सेंटरचे  मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. नंदकुमार देशमुख, महापालिकेचे  अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे,  डॉ. वर्षा डांगे, निरामय हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. कमल यादव, डी.वाय.पाटील मेडीकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. जितेंद्र भवळकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजीव दात्ये, इंडियन मेडिकल असोसिएशनचे इंडियन मेडिकल असोसिएशन पॅट्रन डॉ. दिलीप कामत, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ. सत्यजीत पाटील, डी.वाय.पाटील मेडीकल कॉलेज ऊरो विभाग प्रमुख डॉ. मधुसुदन भरतवाल  आदी उपस्थित होते.

क्षयरोगाचा जीवाणु शोधणारे शास्ञज्ञ डॉ. रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. शहर क्षयरोग दुरीकरण अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर यांनी क्षयरोग दुरीकरण प्रतिज्ञेचे पठन केले तसेच डॉ. अंजली ढोणे यांनी प्रस्ताविक मनोगतात शहरातील क्षयरोगाची सद्यस्थिती व महानगरपालिका करत असलेल्या क्षयरोग दुरीकरणाच्या उपाय योजनांची माहीती दिली.

क्षयरोग दिनानिमित्त उत्कृष्ट कामकाज करणा-या कर्मचा-यांचा तसेच उपस्थित मान्यवरांचा, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, एनजीओ, सीएचव्ही व म.न.पा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांचा सत्कार गुलाब पुष्प व प्रशस्तीपञक देऊन करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.