Talegaon News : लग्नास नकार दिल्यानंतरही पाठलाग, महाविद्यालयीन विद्यार्थिनीने प्राशन केले किटकनाशक 

एमपीसी न्यूज – लग्नासाठी नकार दिल्याने मुलाने महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा वारंवार पाठलाग केला व इन्स्टाग्रामवर दोघांचे फोटो शेअर केले, तसेच फोन वरती शिवीगाळ करून धमकी दिली. या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन विद्यार्थीनींने शेतावर फवारणी करण्याचे औषध प्राशन केले. जानेवारी ते 23 मार्च 2022 या कालावधीत दारुब्रे, मावळ येथे ही घटना घडली.

याबाबत महाविद्यालयीन विद्यार्थीनीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून ओमकार गणेश देशमुख (रा. गोडुम्ब्रे, मावळ) याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 354 (ड), 504, 506, 499 पोक्सो कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओमकार याने फिर्यादी मुलीला लग्नाची मागणी घातली. मुलीने लग्नास नकार दिला. त्यानंतर त्याने फिर्यादी मुलीचा महाविद्यालयाच्या मार्गावर पाठलाग केला. बहिणीच्या फोनवर फोन करून शिवीगाळ केली व धमकी दिली.

तसेच, फिर्यादी यांच्या नावाने इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून त्यावरती दोघांच्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले. वारंवार धमकी दिल्याने टेन्शन घेतलेल्या मुलीने बुधवारी (दि.23) सकाळी 10.30 वा राहत्या घरी शेतावर फवारणी करण्याचे औषध प्राशन केले. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.