Sthanik Swarajya Sanstha : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी, एससी, एसटी उमेदवारांना पक्षाने संधी द्यावी

एमपीसी न्युज – आगामी स्थानिक स्वराज्य संस्था (Sthanik Swarajya Sanstha) निवडणुकीत राष्ट्रवादीतील सक्षम ओबीसी, अनुसुचित जाती व जमातीमधील इच्छुक उमेदवारांना पक्षाने संधी द्यावी, अशा मागणीचे निवेदन सेलच्या पदाधिकाऱ्यांनी कोअर कमिटीला दिले.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 27 टक्के आरक्षण वैध ठरवले. महाविकास आघाडी सरकारने स्थापन केलेल्या बांठिया आयोगामुळे ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले. यावेळी सर्व ओबीसी बांधवानी या निर्णयाचे स्वागत केले.

Pune Lonavala local : पुणे लोणावळा लोकलची संख्या वाढविण्याची मागणी

नुकत्याच होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील (Sthanik Swarajya Sanstha) जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका ओबीसी आरक्षित जागेवर अनेक ओबीसी तरुण उमेदवार इच्छुक आहेत. ते पक्षात सक्रिय आहेत. मावळ तालुक्यात ओबीसी सेल, सामाजिक न्याय विभाग, अल्पसंख्यांक विभाग यांचे संघटनेच्या बांधणीमध्ये मोठा वाटा आहे. पक्षात सक्रिय काम करत असलेल्या इच्छुक उमेदवारांना ओबीसी, अनुसुचित जाती व जमाती आरक्षित जागेवर उमेदवारी मिळावी अशी मागणी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेल, सामाजिक न्याय विभाग, अल्पसंख्यांक विभागाच्या पदाधिकारी यांनी कोअर कमिटी सदस्य आमदार सुनिल शेळके, गणेश खांडगे, बापुसाहेब भेगडे, बबनराव भेगडे, विठ्ठलराव शिंदे, सुभाषराव जाधव, बाबुराव वायकर, दिपक हुलावळे यांना निवेदनाद्वारे केली.

यावेळी पुणे जिल्हा ओबीसी सेल कार्याध्यक्ष अतुल राऊत, मावळ तालुका ओबीसी सेल अध्यक्ष मंगेश खैरे, महिला अध्यक्षा संध्या थोरात, ज्येष्ठ नगरसेवक आयुब शिकीलकर,मावळ खादी ग्रामोद्योग संघ चेअरमन अंकुश आंबेकर, नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, मावळ सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष विकी लोखंडे, ओबीसी वरिष्ठ उपाध्यक्ष सोमनाथ धोंगडे, तळेगाव सचिव गोकुळ किरवे, वडगाव ओबीसी सेल अध्यक्ष मयुर गुरव, इंदोरी ओबीसी सेल अध्यक्ष स्वप्निल शेवकर, सामजिक न्याय विभाग महिला अध्यक्षा ज्योती आंबेकर, मावळ तालुका ओबीसी सेल उपाध्यक्षा सविता मंचरे, वैशाली लगाडे, अर्चना भोकरे, नीलिमा शिंदे, सुधा भालेकर, लक्ष्मी गजाकोश, गणेश पाटोळे, सोनू भालेराव, राहिल तांबोळी पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.