PDMBA News : बॅडमिंटनसाठी पुण्यातून चांगले खेळाडू मिऴाले – गोपिचंद; ‘पुना गेम’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – बॅडमिंटनमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे अनेक खेळाडू चमकले आहेत. त्यातही पुण्यातून चांगले खेळाडू मिळाले आहेत.मीसुध्दा पुण्यातच राष्ट्रीय पातळीवरील पहिली स्पर्धा पुण्यातूनच खेऴलो होतो, असे प्रतिपादन भारताचा बॅडमिंटनपटू पुल्लेला गोपिचंद याने आज व्यक्त केले.

पूना डिस्ट्रीक्ट आणि मेट्रोपोलिटन बॅडमिंटन असोसिएशन यांच्यावतीने असोसिएशनला 75 वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त काढलेल्या ‘पुना गेम’ या नावाने काढलेल्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन गोपिचंद यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. तब्येत खराब असल्याने गोपिचंद यांनी आनलाईन पध्दतीने या कॅफी टेबल बुकचे प्रकाशन केले. व्हिडीओव्दारे आपला संदेश दिला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय मिश्रा होते. मात्र त्यांनीसुध्दा व्हिडीओव्दारे उपस्थिती लावली होती. त्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गजानन एकबोटे हेसुध्दा पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले की, आज व्यायामाची नितांत गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालू केलेला फिट इंडीया हा उपक्रम अतिशय चांगला आहे आणि आवश्यकसुध्दा आहे. त्यांनी याप्रसंगी पीडीएमबीएचे कौतुक केले आणि भविष्यातील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमा दरम्यान एकबोटे यांच्या हस्ते मंजुताई वारदेकर, सुरेश फळणीकर, एस.व्ही.नातू, के.आर.शेट्टी, अनिल मोडक,गिरीश नातू, मंजुशा कन्वर,मंजुषा सहस्त्रबुध्दे,दिलिप कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.

पीडीएमबीएचे अध्यक्ष अनिरुध्द देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी त्यांनी आगामी तीन महिन्यात असोसिएशनच्यावतीने एप चालु करण्यात येणार असल्याचे सांगितले.

अतुल बिनिवाले यांनी सुत्रसंचालन करुन आभार प्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.