Petrol Diesel Price Today : पेट्रोल, डिझेल 80 पैशांनी महागले; एक लिटर पेट्रोलसाठी 119.67 रुपये मोजावे लागणार

एमपीसी न्यूज – पेट्रोल, डिझेलच्या किमती सर्वसामान्य नागरिकांची चिंता दिवसेंदिवस वाढवत आहेत. दररोज पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. मंगळवारी (दि. 5) पेट्रोल आणि डिझेल दोन्ही 80 पैसे प्रति लिटर प्रमाणे वाढले आहे.

मागील 15 दिवसातील ही 13 वी वाढ आहे. या 15 दिवसात पेट्रोल, डिझेलच्या किमतीत 9.25 रुपयांनी वाढ झाली आहे. आज झालेल्या वाढीनंतर दिल्लीत पेट्रोल 104.61 रुपये आणि डिझेल 95.87 रुपये प्रति लीटर मिळेल. मुंबई मध्ये पेट्रोल 119.67 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 103.92 रुपये प्रति लिटर मिळेल. कोलकाता शहरात आज पेट्रोलची किंमत 114.28 रुपये आणि डिझेलची किंमत 99.02 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नई शहरात आज पेट्रोल एक लीटर 110.09 रुपये आणि डिझेल 100.18 रुपये प्रति लिटर मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार देशातील इंधन तेलाच्या किमतींमध्ये बदल होतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने देशातील तेलाच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.