Petrol Price Hike : 18 जुलैपासून देशभरात पेट्रोलचा दर स्थिर, जाणून घ्या आजचा दर

एमपीसी न्यूज : सलग तीन दिवस डिझेलच्या दरात कपात होत होती. मात्र, शनिवारी पेट्रोलियम कंपन्यांनी या दरकपातीला ब्रेक लावला आहे. परिणामी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या तीन दिवसांमध्ये डिझेल 60 पैशांनी स्वस्त झाले होते. मात्र, पेट्रोलच्या किंमतीत कोणताही बदल झाला नव्हता. 18 जुलैपासून देशभरात पेट्रोलचा दर स्थिर आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत प्रतीलिटर डिझेलसाठी 96.84 रुपये मोजावे लागत आहेत. तर पेट्रोलचा दर प्रतिलीटर 107.83 रुपये इतका आहे.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.