Pimpri : भालकर यांना अनाधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण खात्याचा कारभार देण्याची मागणी
एमपीसी न्यूज – प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी अ.मा. भालकर यांच्याकडे अनाधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण खात्याचा पदभार द्यावा, अशी मागणी नगरसेवक शीतल शिंदे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखी निवेदनांद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनांकडून प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी अ.मा. भालकर यांना शहरातील अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमण या खात्याचा पदभार देण्यात यावा. सध्या शहर अभियंता राजन पाटील यांच्याकडे आहे. त्या विभागाचा कार्यभार चालू ठेवावा, असेही म्हटले आहे.