Pimpri: भोसरी, चऱ्होली, दिघी भागात सर्वाधिक 1723 सक्रिय रुग्ण, जाणून घ्या आपल्या भागातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या

Pimpri: Bhosari, Charholi, Dighi area has the highest number of 1723 active patients, find out the number of active patients in your area पिंपरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी भाग येत असलेल्या 'ग' कार्यालयाच्या हद्दीत 1165 सक्रिय रुग्ण आहेत.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून मागील काही दिवसांपासून रुग्ण वाढीचे उच्चांक होत आहेत. पालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक 1723, त्याखालोखाल ‘ग’ प्रभागाच्या हद्दीत 1165 सक्रिय रुग्ण आहेत. हे प्रभाग कोरोना हॉटस्पॉट झाले आहेत. तर, सर्वांत कमी म्हणजेच 481 रुग्ण ‘ह’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत आहेत.

महापालिकेने गुरुवारी (दि.30) रात्री दिलेल्या नकाशानुसारची ही आकडेवारी आहे. आज आतापर्यंत 149 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. शहरातील 7341 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 20 हजार 591 वर पोहोचली आहे.

शहरात 10 मार्च रोजी पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून शहरातील 20 हजार 591 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 12 हजार 902 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 7341 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, 348 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. 15 ऑगस्टपर्यंत शहरातील रुग्णसंख्या 50 हजार होईल असा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.

महापालिकेकडून शहरात कोरोनाचे किती सक्रिय रुग्ण आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती असलेला क्षेत्रीय कार्यालनिहाय नकाशा दररोज प्रसिद्ध केला जातो.

गुरुवारी रात्री प्रसिध्द केलेल्या नकाशानुसार भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी परिसर येत असलेल्या ‘इ’ प्रभागाच्या हद्दीत सर्वाधिक 1723 तर त्याखालोखाल पिंपरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी भाग येत असलेल्या ‘ग’ कार्यालयाच्या हद्दीत 1165 सक्रिय रुग्ण आहेत.

क्षेत्रीय कार्यालयानिहाय सक्रिय रुग्ण संख्या!
‘अ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संभाजीनगर, मोहननगर, आनंदनगर, चिंचवडस्टेशन, आकुर्डी, प्राधिकरण, आनंदनगर, भाटनगर भागात 897 सक्रिय रुग्ण आहेत. प्रभागातील रुग्णसंख्या दोन हजाराच्या पुढे गेली होती. आता नियंत्रणात आली आहे.

‘ब’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या रावेत, किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड प्रभागात 1050 सक्रिय रुग्ण आहेत.

‘क’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा, बोऱ्हाडेवाडी, धावडेवस्ती, इंद्रायणीनगर भागात कोरोनाचे 709 रुग्ण आहेत.

‘ड’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव भागात कोरोनाचे सर्वात कमी म्हणजेच 584 सक्रिय रुग्ण आहेत.

‘इ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी भागात कोरोनाचे सर्वाधिक 1723 रुग्ण आहेत. च-होली, दिघी भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे.

‘फ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या चिखली, कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर, यमुनानगर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22 या प्रभागात कोरोनाचे 888 रुग्ण आहेत.

‘ग’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पिंपरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी भागात कोरोनाचे 1165 सक्रिय रुग्ण आहेत.

‘ह’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संत तुकारामनगर, महात्मा फुलेनगर, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, नवी सांगवी, सांगवी भागात कोरोनाचे सर्वांत कमी म्हणजेच 481 सक्रिय रुग्ण आहेत.

तर, आज शुक्रवारी दुपारी एक वाजेपर्यंत 149 जणांना लागण झाली आहे. शहरात एकूण 7341 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर महापालिका, खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.