Pimpri: पॉलिग्रासची निविदा रद्द करा; दत्ता साने यांची मागणी

एमपीसी न्यूज – नेहरुनगर येथील हॉकी स्टेडियमध्ये बसविण्यात येणा-या पॉलिग्रासची निविदा प्रक्रिया अनागोंदी पद्धतीने राबविली आहे. अधिका-यांनी संगनमत करुन निविदा प्रक्रिया केली आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात साने यांनी म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान बनविण्यासाठी हे पॉलिग्रास बसविण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे. त्यासाठी राबविलेली निविदा प्रक्रिया संशायस्पद आहे. त्यामध्ये ठेकेदार डोळ्यासमोर ठेऊन निविदा प्रक्रिया केली आहे.

ही निविदा प्रक्रिया राबविताना हॉकी खेळाशी संबंधित मान्यताप्राप्त संघटनांसोबत महापालिकेने चर्चा करणे गरजेचे होते. परंतु, अशी कोणतीही चर्चा केली नाही. मनमानी पद्धतीने ही निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. ठेकेदाराची कोणतीही माहिती न घेता तीन कोटी 76 लाखाचा काम दिले आहे.

हॉकी खेळाशी संबंधित मान्यताप्राप्त संघटनांनी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले आहे. त्याबाबत कोणतीही माहिती न घेता ठेकेदाराला काम दिले आहे. स्थायी समितीने देखील कोणतीही शहानिशा न करता काम दिले आहे. त्यामुळे ही निविदा तत्काळ रद्द करण्यात यावी. निविदा रद्द न केल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा साने यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.